
शासकिय दस्तावेजमध्ये अफरातफर केल्याचा ठपका
चंद्रपूर : शासकिय दस्तावेजमध्ये अफरातफर केल्याचा ठपका ठेवत बल्लारपूर सांझाचे तलाठी रोहित सिंग चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहितुनुसार, यूवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे आणि पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा प्रिया झांबरे यांनी बल्लारपुर साझाचे तलाठी रोहीतसिंग चौहान यांची तक्रार राज्याच्या मुख्य सचिवाकडे केली होती. यावर प्राथमिक चौकशी करून तलाठी रोहित सिंग चौहान यांच्यावर शासकिय कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सूर्यवंशी (पाटील) यांनी त्यांना 6 महिन्यासाठी निलंबित केले. त्यांच्या साझाकरीता तत्काळ तलाठी म्हणून शंकर खरूले यांची नियुक्ती करण्यात आली आहेत.




