
सामानाची नासधूस : तीन चोर जेरबंद
चोरांचे हौसले सध्या बुलंद झाले असून चोरांनी चक्क चंद्रपुरातील खासदारांचा बंगालच फोडला मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. चोरांनी घरातील कपाट फोडले सामानांची नासधुस केली . यावेळी केवळ चौकीदार आणि त्यांची पत्नीच बंगल्यात होते ही घटना काळ रात्री घडली . काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा सरकार नगर येथे सूर्यकिरण नावाचा बंगला आहे . याच बंगल्यात त्यांचे कार्यालयसुद्धा होते आता कार्यालय दुसरीकडे हलविले ,मात्र निवासासाठी खासदार धानोरकर या बंगल्याचा वापर करतात . काळ मंगळवारी ते मुक्कामी नव्हते रात्री वरोऱ्याला निघून गेले हीच संधी साधून मध्यरात्रीच्या
सुमारास चोरट्यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला ,त्यावेळी चौकीदार आणि त्यांची पत्नी बंगल्यालगच्या खोलीमध्ये गाढ
झोपेत होत्या ,त्यानंतर चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले . मात्र निवासासाठी खासदार धानोरकर या बंगल्याचा वापर करतात . काळ मंगळवारी ते मुक्कामी नव्हते रात्री वरोऱ्याला निघून गेले हीच संधी साधून मध्यरात्रीच्या
सुमारास चोरट्यांनी बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला ,त्यावेळी चौकीदार आणि त्यांची पत्नी बंगल्यालगच्या खोलीमध्ये गाढ
झोपेत होत्या ,त्यानंतर चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले . मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. चोरांनी मात्र सामानाची नासधूस केली, कपाट फोडले , नेहमीप्रमाणे चौकीदार साफसफाई करण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी भ्रमरध्वनीवरून खासदार धानोरकर यांनी घरफोडीची माहिती दिली . या घटनेची तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसात दाखल केली त्या नंतर पोलीस यंत्रणा हादरली . मोठा फौज फाटा खासदाराच्या बंगल्यावर पोहचला बंगल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तीन युवक कुलूप तोडून आत प्रवेश करतांना दिसले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार केली बारा तासांच्या आत तिघांनाही जेर बंद केले. रोहित इमलकर वय २४, राहणार दुर्गापूर , शंकर नेवारे वय २० राहणार दुर्गापूर , तन्वीर बेग वय २० भंगाराम वॉर्ड चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत . खासदारांच्या बंगल्यातून खाली हात पार्ट यावे लागल्याने या तिघांनी आणखी यया परिसरातील दोन घर फोडली . मागील काही दिवसांपूण चोरटे खासदारांच्या बंगल्याची रेकी करत होते . त्यांना खासदार येतात कधी मुक्कामी कधी असतात याची खडानखडा माहिती होती , त्यामुळेच खासरार नसतांना त्यांनी बंगल्यात कुलूप तोडून आत प्रवेश करण्याची हिम्मत केली मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही , जिल्ह्यात खूप चोरीच्या घटना वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर चक्क खासदारांचा बंगला लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला तर सर्वसामान्यांचे काय यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .



