चंद्रपूरकरांनो विनाकारण फिरत असाल, तर व्हा सावधान :
चंद्रपूर आज दि. ११ मे : आज जटपुरा गेट इथे दुपारी ३ वाजे पर्यंत विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट केल्या जाईल.कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता चंद्रपूरचा क्रमांकही वरच्या बाजुलाच आहे. शहरात रोज जवळपास हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. कोरोनाची साखळी तोडून रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या हेतूनं राज्याच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी लावण्यात आली आहे. काही सेवांना यातून सूट दिलेली असली तरी काही लोक विनाकारण रस्त्यांवर फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या अँटिजेन चाचणी केल्या जाणार आहेत. मनपा आयुक्त राजेश मोहिते आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी नागरिकांना विनाकारण बाहेर न फिरण्याचे आवाहन केले आहे.
त्यामुळं तुम्ही जर चंद्रपूरात असाल तर बाहेर पडण्यापूर्वी खरंच काम महत्त्वाचं आहे का याचा विचार करा. कारण बाहेर गेल्यावर तुम्हाला चाचणीला सामोरं जावं लागू शकतं.

