गडचिरोली

गडचिरोलीजिल्हयात एका कोरोना बाधिताच्या मृत्यूसह 118 नवीन बाधित, तर 70 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका),दि.28*: कोरोनामुळे एक मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5541 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4572 वर पोहचली. तसेच सद्या 914 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 55 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यूमध्ये रेगडी चामोर्शी येथील 57 वर्षीय पुरूष असून आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 16.50 टक्के तर मृत्यू दर 0.99 टक्के झाला. नवीन 118 बाधितांमध्ये गडचिरोली 46, अहेरी 10, आरमोरी 7, भामरागड 9, चामोर्शी 7, धानोरा 0, एटापल्ली 14, कोरची 6, कुरखेडा 4, मुलचेरा 11, सिरोंचा 1 व वडसा येथील 3 जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 70 रूग्णांमध्ये गडचिरोली 38, अहेरी 4, आरमोरी 6, भामरागड 0, चामोर्शी 1, धानोरा 0, एटापल्ली 6, मुलचेरा 1, सिरोंचा 0, कोरची 3, कुरखेडा 6 व वडसा मधील 5 जणांचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये बट्टुवार कॉम्प्केक्स येथील 2, वियानी शाळेच्या मागे 1, नवेगाव येथील एसबीआय बँकेच्या मागे 1, कन्नमवार वार्ड 1, डोंगरे पेट्रोलपंपच्या मागे 2, झांसी राणी नगर 3, नवेगाव 5, रामपुरी वार्ड 2, धुंडेशिवनी 1, ॲन्टी करप्शन कार्यालय येथील 1, स्नेहानगर 1, गोकुलनगर 2, आरमोरी रोड 1, साईनगर चामोर्शी रोड 1, आशिर्वाद नगर 1, इंदिरानगर 3, स्थानिक 1, त्रिमुर्ती चौक 2, आयटीआय चौक 5, मोहडोंगरी 1, कलेक्टर कॉलनी 1, बसेरा कॉलनी 1, गोंडवाना युनिर्व्हसिटीच्या समोर 1, महाडवाडी 1, कॅम्प एरिया 1, मुरखडा 1, रेड्डी गोडाऊन जवळ 1, साईनगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 1, स्थानिक 8, बेंगाली कॅम्प सुभाष चौक धाम नगर 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 5, सुभाष चौक 1, बझार टोले 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 9, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी येथील 6, स्थानिक 1, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 11, सीआरपीएफ जवान 1, एलडांडी 1, जांभिया 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, सतपुती येथील 1, जगदवाही येथील 3, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये वडेगाव येथील 2, स्थानिक 1, नवरगांव विल 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये कलीनगर 1, बोलेपल्ली येथील 10, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये एसआरपीएफ कॅम्प विसोरा येथील 1, जुनी वडसा 1, चोप 1 चा समावेश आहे. तसेच इतर तालुक्यातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *