
चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. गत तीन दिवसापासून 200 च्या आसपास बाधीत रूग्ण आढळत आहे.
दोन दिवसापूर्वी चंद्रपूर चे लोकप्रिय आमदार हे पॉझिटिव्ह आढळले.
ते चंद्रपूर येथील वन अकॅडेमी येथे उपचार घेत होते.
परंतु 31 ऑगस्टच्या मध्यरात्री आमदार जोरगेवार यांना श्वसनाचा त्रास जाणविल्याने त्यांना पुढील उचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.



