आवळगाव (प्रति)पूर्वी व हल्ली खेडेगावात धाना वरती निसर्गाच्या कोपाने अळी पडल्यास गावातील गावकरी अळी बांधण्याचा कार्यक्रम हाती घेऊन अळीचा समूळ नायनाट करण्यासाठी रातभर जागरण भजन कीर्तन करुन गावा सभोवतालच्या सीमा बंद करून अळीबांधण्याचा कार्यक्रम करीत असत. हा परंपरेनुसार चालत आलेला समज होता. आता या विज्ञान युगात संसर्गजन्य रोग हा देवाचा नाही हे कोरोना या साथीच्या जीवघेण्या रोगाने शहरापासून ते खेड्यापर्यंतच्या लोकांना दाखवून दिले. हा संसर्गजन्य रोग संपूर्ण भारतभर पसरू नये म्हणून शासनाने उचललेले जिल्हा बंदीचे एक पाऊल आणि घेतलेला योग्य निर्णय आहे. शासनाने दिलेल्या हाकेला समर्थपणे साथ देण्यासाठी खेड्यातील जनता सुद्धा सज्ज झाली आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यापासून ३० कि.मी. अंतरावर असलेल्या आदर्श आवळगाव येथील सुशिक्षित तरुणांनी १४४ कलमाचे तंतोतंत पालन करण्याचे दृष्टीने गावबंदी लागू केली आहे. त्यांनी गांगलवाडी, मुडझा कडे जाणाèया मुख्य मार्गावराती झाड आडवे ठेऊन मार्ग बंद केला आहे. प्रसंगाला अनुसरून क्वचित गावात अथवा गावाबाहेर येणारे जाणारे असतील तर गावाबाहेरच हात धुण्यासाठी पाणी आणि हँड वाश ची व्यवस्था केली आहे. त्यांना हात धुतल्या शिवाय गावामध्ये व गावाबाहेर जाऊ देत नाही. हा कौतुकास्पद उपक्रम आवळगाव येथील क्रियाशील नवे नेतृत्व अश्र्वजित जनबंधु, पिंटु आंबोरकर, विराज बानवाडे, रुपेश बानबले, हेमंत दर्वे, सूरज पोटे, रजत मदनकर, मस्के, निलेश गावतुरे, लंकेश वाढणकर, अमोल भोयर, रेवण शेंडे, आकाश घुबडे, वासुदेव नरुले सदस्य, सुधाकर सातपुते यांनी हा क्रियाशील उपक्रम राबऊन आवळगाव वाशियांनी कोरोना विरुद्ध दंड थोपटले आहे.



