चंद्रपूर(का.प्र.): शहरालगत असलेल्या लोहारा गावातील जंगल परिसरात काल दुपारी 4 वाजता एका झाडाला इसमाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. गुरुदास शेडमाके असे मृत इसमाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही नागरिक लोहारा गावातील जंगल परिसरात दुपारच्या सुमारास गेले असता त्यांना एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती गावातील नागरिकांना पोलिसांना देण्यात आली.त्यानंतर रामनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत..
Related Articles
जिल्ह्यातील खनीज संपत्तीचा उपयोग करून रोजगार निर्मितीला चालना देणार- – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : चंद्रपूर हा खनीज संपत्तीने समृध्द जिल्हा आहे. गौण खनिजमधून राज्याला मिळणारे सर्वाधिक महसुली उत्पन्न आपल्या जिल्ह्याचे आहे. खनिकर्म विभागाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोळसा, चुनखडक, लोहखनीज याशिवाय तांबे हे एक धोरणात्मक खनीज असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तांब्याची महत्वपूर्ण भुमिका आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 11 कोटी टन […]
वृक्षारोपण मोहीमेस सर्वांचे सहकार्य आवश्यक – आयुक्त विपीन पालीवाल
मनपा करणार २५ हजार वृक्षाची लागवड ५.६ टक्के हरित क्षेत्र वाढविण्याची गरज चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात मनपातर्फे २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असुन या मोहीमेत शहरातील सर्व नागरीक, स्वयंसेवी संस्था,लोकप्रतिनिधी यांचा सहभाग अतिशय आवश्यक असुन मोहीमेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे. आज आपण वृक्ष लावले तर येत्या १० ते […]
ताडोबातल्या वाघिणींची शौर्यगाथा : महिला वन्यजीव सफारी गाईडच्या जिद्दीची साहसी गोष्ट .
‘माझा जन्मच ताडोबातला. बाबा वनमजूर आणि ताडोबा तलावाच्या काठावर आमची कॉलनी. जंगलात हुंदडतच मी मोठी झाले,’ शहनाझ बेग सांगत होती. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातली ही पहिली महिला गाइड! शहनाझ एका एनजीओसाठी क्लॉडिया नावाच्या महिलेची मदतनीस म्हणून काम करत होती. क्लॉडियानं एकदा तिला विचारलं, ‘तू का नाही गाइड बनत?’ शहनाझनं वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं. ते म्हणाले, ‘प्रयत्न करून […]



