चंद्रपुर

चंद्रपूर शहरात एकाच कुटुंबातील ४ नागरिक पॉझिटीव्ह

चंद्रपूर जिल्हातील ४३ बाधित
कोरोना आजारातून झाले बरे
आतापर्यतची बाधित संख्या ६२
जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित १९                                          चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणारे ३ नागरिक काल २३ जून रोजी बाधित आढळले होते. आज याच कुटुंबातील १९ वर्षीय मुलीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला आहे.जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ६२ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या अॅक्टिव्ह बाधितांची संख्या फक्त १९ असून आतापर्यंत ४३ नागरिक कोरोना आजारातून बरे झाले आहे.हैदराबाद शहरातून १६ जून रोजी आलेल्या लुंबीनी नगर भागातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणाऱ्या आई ( ४० वर्षीय ) वडील ( ४७ वर्षीय ) व मुलगा ( २१ वर्षीय )बाधित असल्याचा अहवाल काल आला होता. आज मुलीचा देखील अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मुलीचे स्वॅब नमुने २३ जून रोजी घेण्यात आले होते. २४ जून रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *