चंद्रपूर (का.प्र.): दिनांक १८/०६/२०२० गुरवारला ११:३० वाजता महाकाली कॉलरी भुमिगत कोळसा खाणीत कामावर असतांना अविनाश ठावरी (३९) रा. महाकाली कॉलरी, चंद्रपुर यांच्या खाणीच्या आतील कोळश्याचे मोठे ढेले अंगावर पडल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यांना खाणीच्या आतील भागातुन तब्बल दिड तासानंतर १ वाजता बाहेर काढण्यात आले. त्यानंतर लालपेठ एरीया हॉस्पिटल येथे उपचारा साठी भर्ती करण्यात आले. परंतु रात्री ८ वाजताच्या दरम्यान त्यांचा तिथेच मॄत्यु झाला. चांगला उपचार मिळाला असता तर त्याचा जिव वाचला असता. परंतु चांगला वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याचा मॄत्यु झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयानी व कामगार संघटनांनी महाकाली कॉलरी भुमिगत कोळसा खाणीच्या व्यवस्थापनावर लावला आहे.
Related Articles
जिल्ह्यातील खनीज संपत्तीचा उपयोग करून रोजगार निर्मितीला चालना देणार- – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : चंद्रपूर हा खनीज संपत्तीने समृध्द जिल्हा आहे. गौण खनिजमधून राज्याला मिळणारे सर्वाधिक महसुली उत्पन्न आपल्या जिल्ह्याचे आहे. खनिकर्म विभागाच्या चंद्रपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. कोळसा, चुनखडक, लोहखनीज याशिवाय तांबे हे एक धोरणात्मक खनीज असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तांब्याची महत्वपूर्ण भुमिका आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 11 कोटी टन […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २१२ जण कोरोना बाधित *तसेच जिल्ह्यात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या-१३६१२ *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या-१०४५४ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या-२९५३ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या-२०५ जिल्ह्यात (१९४) बाहेरील (११) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. *सोशिअल डिस्टंसिंगचे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर […]



