चंद्रपूर : ऊर्जानगर येथील समता नगर येथे एका सलून व्यावसायिकाने आत्महत्या केली. स्वप्नील चौधरी २७ असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. शेजारी राहणाऱ्या युवकाने आज (१५ जून) सकाळी ७.३० वाजता स्वप्नील अजून उठला नाही म्हणत आवाज दिला.परंतु काहीही प्रतिसाद मिळत नाही आहे हे बघत शेजारील लोक एकत्रित झाले आणि दार उघडून बघितले असता स्वप्नील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. लगेच पोलिसांना कळविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील च्या आई-वडीलांना अगोदरच देवाज्ञा झालेली आहे तो घरी एकटाच राहत होता.
कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन झाल्यामुळे सलून व्यवसायाला झळ पाहोचली आहे. उपासमार होत असल्यानेच तर या सलून व्यावसायिकांने आत्महत्या केली नसेल ना असे अशी चर्चा परिसरात सुरु आहे.



