चंद्रपुर

31 ऑगस्‍ट पर्यंत चंद्रपूर जिल्‍हयातील शाळा सुरू होणार नाही

31 ऑगस्‍ट पर्यंत चंद्रपूर जिल्‍हयातील शाळा सुरू होणार नाही
शालेय शिक्षण विभागाच्‍या सचिवांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्‍वासन.
चंद्रपूर (का.प्र):चंद्रपूर शहरात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व चंद्रपूर जिल्‍हयात कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेता चंद्रपूर जिल्‍हयातील शाळा 31 ऑगस्‍ट पर्यंत सुरू करण्‍यात येवू नये अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाकडे केली आहे.दिनांक 31 जुलै रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील संस्‍था चालक तसेच पालकांच्‍या शिष्‍टमंडळाने आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व तुर्तास शाळा सुरू न करण्‍याची मागणी केली. आ. मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण विभागाच्‍या सचिव श्रीमती वंदना कृष्‍णा यांच्‍याशी तात्‍काळ दुरध्‍वनीद्वारे संपर्क साधत त्‍यांच्‍याशी चर्चा केली व सद्यःस्थितीत कोरोनाचा प्रकोप बघता जिल्‍हयातील शाळा 4 ऑगस्‍ट पासून सुरू होण्‍याच्‍या बातमीमुळे जिल्‍हयातील पालकांमध्‍ये तसेच संस्‍था चालक व शिक्षकांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्‍यामुळे 31 ऑगस्‍ट पर्यंत सुरू करण्‍यात येवू नये, अशी विनंती केली. शालेय शिक्षण विभागाच्‍या सचिवांनी सुध्‍दा 31 ऑगस्‍ट पर्यंत शाळा सुरू करण्‍यात येणार नाही याबाबत आ. मुनगंटीवार यांना आश्‍वस्‍त केले. त्‍यामुळे आता पालक, शिक्षक व संस्‍था चालकांना दिलासा मिळालेला आहे.

Reply, Reply all or Forward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *